११२ बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

नवी मुंबई - नवी मुंबईतील रस्ते आणि पदपथांवर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या आणि स्वच्छता सर्वेक्षणाच्या आड येणाऱ्या बेवारस वाहनांवर शुक्रवारी (ता. १२) महापालिकेने कारवाई केली. यात दिघा ते बेलापूरपर्यंतच्या रस्त्यांवरील ११२ वाहने टोईंग व्हॅनने उचलून कोपरखैरणेतील जुन्या क्षेपणभूमीवर ठेवली आहेत. इतर वाहनांना नोटीस चिकटवून वाहन उचलण्याच्या सूचना मालकांना दिल्या आहेत.

अनेक महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी रस्ते, पदपथ व मोकळ्या जागी उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्वच्छतेत अडथळा येत आहे. या वाहनांमुळे रहदारीतही अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. अशी वाहने संबंधित मालकांनी तत्काळ हटवावी, असे अनेकदा पालिकेने आवाहन केले होते; मात्र संबंधित वाहनांच्या मालकांकडून कोणतीच हालचाल न झाल्याने पालिकेने पुन्हा एकदा बेवारस वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे. 

स्वच्छता मोहिमेत रस्त्यावरील बेवारस वाहनांचा अडथळा आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिला आहे.

तुर्भेत विभाग आघाडीवर
बेलापूर विभागातील १४ चारचाकी व दोन दुचाकी, नेरूळ विभागात पाच चारचाकी व दोन दुचाकी, वाशीत पाच चारचाकी, चार दुचाकी व एक तीनचाकी, तुर्भेत १७ चारचाकी, १८ दुचाकी व सहा तीनचाकी, कोपरखैरणेत ११ चारचाकी, घणसोलीत नऊ चारचाकी, ऐरोली विभागात ११ चारचाकी, दोन तीनचाकी व एक सहाचाकी, दिघा विभाग तीन चारचाकी व दोन सहाचाकी अशी ७५ चारचाकी, नऊ तीनचाकी, २६ दुचाकी अशा एकूण ११२ बेवारस वाहनांवर कारवाई केली. पालिकेच्या या कारवाईमुळे बेवारस वाहनांची संख्या कमी होईल.

Web Title: mumbai news Action on unprovoked vehicles