अंधेरीत अभिनेत्रीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई - हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृतिका चौधरी (25) असे तिचे नाव आहे. तीन-चार दिवसांपूर्वी तिची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

कृतिका ही हिंदी दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये भूमिका करत होती. ती अंधेरी पश्‍चिममधील भैरवनाथ सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर एकटीच राहत होती. तिच्या घरातून सोमवारी (ता.12) सायंकाळी दुर्गंधी येत असल्याची माहिती रहिवाशांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली. काही वेळातच अंबोली पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा कृतिका मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवविच्छेदनाकरता रुग्णालयात पाठवला. कृतिकाची हत्या तीन-चार दिवसांपूर्वी झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे निश्‍चित कारण समजू शकेल.

Web Title: mumbai news actress murder in andheri