अभिनेत्री सुमिता सन्याल यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप पाडणाऱ्या सुमिता सन्याल (वय 71) यांचे रविवारी कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले.

मुंबई - बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप पाडणाऱ्या सुमिता सन्याल (वय 71) यांचे रविवारी कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले.

सुमिता सन्याल यांचे खरे नाव मंजुळा सन्याल होते. 9 ऑक्‍टोबर 1945 ला दार्जिलिंगमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्रामुख्याने बंगाली चित्रपटांत काम केले होते. "आनंद', "आशीर्वाद' , "गुड्डी', "मेरे अपने' आदी हिंदी चित्रपटांत, तसेच काही हिंदी नाटक-मालिकांतही त्यांनी काम केले होते. "आनंद' मध्ये त्यांनी साकारलेली "रेणू' या व्यक्तिरेखेने अनेकांच्या मनात घर केले होते.

Web Title: mumbai news actress sumita sanyal death