सुविधा नाही तर कर नाही ....कल्याण पूर्व मध्ये उद्या मूक मोर्चा......

रविंद्र खरात 
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

सुविधा नाही तर कर नाही , अशी घोषणा सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यानी पुकारताच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे . कल्याण पूर्व मध्ये दूषित पाणी, कचरा , खराब रस्ते, रखडलेला स्कायवाक, फेरीवाला प्रश्न , रस्ता रुंदीकरण केले मात्र पुर्नवसन नाही अशा विविध समस्या सोडविण्यात कल्याण डोंबिवली महानगर पालिका अपयशी ठरली आहे

कल्याण - कल्याण पूर्व मध्ये समस्येचा महापूर असून कल्याण डोंबिवली महानगर पालिका विविध कर वसूल करते; मात्र सुविधा देत नाही , यामुळे नागरिकांना मध्ये संताप असून "सुविधा नाही तर कर नाही' याचे पहिले पाऊल म्हणून उद्या (सोमवार) सायंकाळी मेणबत्ती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे . 

सुविधा नाही तर कर नाही , अशी घोषणा सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यानी पुकारताच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे . कल्याण पूर्व मध्ये दूषित पाणी, कचरा , खराब रस्ते, रखडलेला स्कायवाक, फेरीवाला प्रश्न , रस्ता रुंदीकरण केले मात्र पुर्नवसन नाही अशा विविध समस्या सोडविण्यात कल्याण डोंबिवली महानगर पालिका अपयशी ठरली आहे. कल्याण पूर्व मधील नागरीकाकडून कर वसूल केला जातो; मात्र सुविधा शून्य , म्हणून कल्याण पूर्व मधील सामाजिक संघटना स्वराज्यच्या पुढाकाराने उद्या (सोमवार) सायंकाळी 5 वाजता कल्याण पूर्व मधील ड पालिका प्रभागक्षेत्र कार्यालय ते जे / 4 कार्यालय दरम्यान नागरीक मेणबत्ती मुकमोर्चा काढत पालिकेचा निषेध व्यक्त करणार आहे. यावेळी सह्यांची मोहीमही राबविण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news: agitation