आझाद मैदान येथे दिव्यांगांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई: आझाद मैदान येथे दिव्यांगांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु झाले असून, आमच्या मागण्या आम्ही मान्य करुन घेणारच असा दृढ़ संकल्प त्यांनी 'ई सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

मुंबई: आझाद मैदान येथे दिव्यांगांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु झाले असून, आमच्या मागण्या आम्ही मान्य करुन घेणारच असा दृढ़ संकल्प त्यांनी 'ई सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

प्रहार जनशक्ति पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांति आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकरी, दिव्यांग व विधवा महिलांसह आमदार बच्चू कडू यांचे अंन्नत्याग आंदोलन होईल, असे त्यांच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी सांगितले.

सन 1995 च्या अपंग कल्याणार्थ असलेल्या कायद्याची तात्काळ अंमल बजावनी करणे महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यात अपंग व्यक्तिस नोकऱ्या, 3% अपंग निधी, दिव्यांग नोंदणी, 3% गाळे वाटप, दिव्यांग बांधवांना-भागिनींना देण्यात येणारे 600 रूपये मानधन वाढवून 1500 रूपये करावे, घरकुल योजनात दिव्यांगाना सरकारी विविध योजनांसाठी सवलती द्याव्यात तसेच जाचक अटी रद्द कराव्यात, मानधना करिता 1 लाखापर्यंत उत्पन्न अट वाढवावी. वित्त महामंडळाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, दिव्यांगाना यूनिक आयडी देण्यात यावेत अशा विविध मागण्या सहित रमाई आणि शबरी घरकुल योजनांत प्राधान्य मिळावे, अशा विविध मागण्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात मांडल्या आहेत.

संघटनेचे रामदास खोत, नागेश सुर्वे, झिनत शेख, भानू नाडर, सुमती शिंदे, सुनील शिंदे, प्रतिक गुप्ता, शरद बोरकर, कुमार बनसोडे, रमेश सरतापे, शाहिद अंसारी, प्रतिक गुप्ता या अपंग कार्यकर्त्यांनी 50 महिला आणि शंभरावर दिव्यांग आंदोलनात सहभागी आहेत.

Web Title: mumbai news Agitation for various demands of handicap at Azad Maidan