जमीन विक्रीत अनियमिततेचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - ठाणे शहरातील रतनशी प्रेमजी चॅरिटी ट्रस्टच्या जमिनीच्या विक्रीत अनियमितता झाली असल्यास विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून चौकशीअंती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

या ट्रस्टच्या मालकीच्या शेकडो एकर जमीन विक्रीसंदर्भात संजय केळकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना राठोड बोलत होते. राठोड म्हणाले, 'या जमिनीपैकी शेकडो एकर जमीन ट्रस्टने धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता विकसकांना विक्री केली आहे का? याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल. विक्रीची परवानगी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी, बनावट पावत्या, कोट्यवधींचा अपहार, मुद्रांक शुल्क या संदर्भात सर्व बाबींची चौकशी होईल. चौकशीत दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.''

Web Title: mumbai news the allegations of irregularities in land sales