ऍलोपॅथिक औषधांसाठी दिलेली परवानगी स्थगित

ऍलोपॅथिक औषधांसाठी दिलेली परवानगी स्थगित

मुंबई - रुग्णांना ऍलोपॅथिक औषधे देण्याची परवानगी होमिओपॅथी डॉक्‍टरांना देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच अंतरिम स्थगिती दिली. या निर्णयामुळे होमिओपॅथिक डॉक्‍टरही ऍलोपॅथिक डॉक्‍टरप्रमाणे रुग्णांना आधुनिक औषधे देऊ शकतात; मात्र अशा प्रकारे सरसकट डॉक्‍टरांना परवानगी देण्याच्या निर्णयाबाबत भारतीय वैद्यकीय संघटनेने नाराजी व्यक्त केली होती आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्या. शंतनू केमकर आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. होमिओपॅथी डॉक्‍टरांना अशा प्रकारची परवानगी देणे रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते, असा दावा याचिकादाराने केला आहे. राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये दिलेल्या निर्णयानुसार 1951 ते 1982 या कालावधीत होमिओपॅथीची पदवी घेतलेल्या डॉक्‍टरांना अशा प्रकारचा परवाना मिळाला आहे; मात्र अशी पदवी संघटनेकडे अधिकृत ठरू शकत नाही, असे याचिकादारांचे म्हणणे आहे. खंडपीठाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com