अंबरनाथ: 'जीआयपी' धरणाच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

रेल्वेने या धरणाकडे वेळीच लक्ष घालणं गरजेचं आहे. अन्यथा अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरासोबतच अनेक परिसरांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकाच्या निर्मितीवेळी अंबरनाथ इथे धरण बांधण्यात आलं होते.

अंबरनाथ : जवळच्या जीआयपी धरणाच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून आता त्यातून पाणी गळती होत असल्याने अंबरनाथ शहराला धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार मागील वर्षी प्रसार माध्यमांनी उजेडात आणल्या नंतरही रेल्वे प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

तर रेल्वेने या धरणाची दुरुस्ती केली असून आता कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण देऊन रेल्वेच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

रेल्वेने या धरणाकडे वेळीच लक्ष घालणं गरजेचं आहे. अन्यथा अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरासोबतच अनेक परिसरांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकाच्या निर्मितीवेळी अंबरनाथ इथे धरण बांधण्यात आलं होते.

दरम्यान या संदर्भात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही लोकसभेत धरणाच्या दुरुस्तीचा मुद्दा उचलून धरत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली आणि प्रत्यक्ष परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. यावर त्यांनीही तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mumbai news ambarnath GIP dam