राम सुतार घडवणार आंबेडकरांचा पुतळा

राम सुतार घडवणार आंबेडकरांचा पुतळा

मुंबई - अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा, गुजरातेतील 522 फुटांचा जगातील सर्वांत मोठा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा असे महत्त्वाचे आणि देशाची ओळख होतील अशा पुतळ्यांनंतर मुंबईतील इंदू मिल परिसरात होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात डॉ. आंबेडकरांचा 250 फुटी पुतळा साकारण्यात येणार आहे. तो साकारण्याची संधी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना मिळाली आहे.

दादरमधील इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक साकारण्यात येणार आहे. तिथे डॉ. आंबेडकरांचा तब्बल 250 फुटांचा ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्यावर सरकारने हा पुतळा साकारण्याची जबाबदारी सोपवली आहे. राम फाईन आर्ट प्रा. लि. या कंपनीशी सरकारने नुकताच याबाबत करार केला. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुतळ्याची उभारणी सुरू होईल. यापूर्वी डॉ. आंबेडकरांचे अनेक पुतळे सुतार यांनी साकारले आहेत.
इंदू मिल परिसरातील आंतरराष्ट्रीय स्मारकातील पुतळा सर्वार्थाने लक्षणीय ठरावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आंबेडकरांचे साहित्य, त्यांच्याविषयीचे लेख, त्यांचे कार्य याविषयी पुन्हा अभ्यास करत असून, त्यांच्या अनन्यसाधारण योगदानाची प्रचिती या पुतळ्यातून येईल, असा प्रयत्न करणार असल्याचे सुतार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com