अमिताभ बच्चन यांचे बांधकाम अधिकृत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या गोरेगाव येथील बंगल्यातील बेकायदा बांधकाम महापालिकेने दंड वसूल करून अधिकृत केले आहे. वास्तुविशारदाने सादर केलेल्या आराखड्यानुसार हे बांधकाम अधिकृत करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. या बंगल्यातील बेकायदा बदलांबाबत पालिकेने डिसेंबर 2016 मध्ये पहिली नोटीस पाठवली होती. अमिताभ यांनी गोरेगाव पूर्वेकडील ऑबेरॉय सेव्हन या संकुलातील बंगल्याच्या मूळ आराखड्यात बदल केला होता. त्याअंतर्गत बदल केल्याप्रकरणी पालिकेने डिसेंबर 2016 मध्ये महाराष्ट्र प्रदेश व शहर नियोजन कायद्यांतर्गत नोटीस पाठवली होती. या बेकायदा बांधकामांवर कारवाई व्हावी, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पाठपुरावा केला होता. अमिताभ यांच्या बंगल्यासह या भागातील इतरही सात बंगले अधिकृत केल्याची माहिती त्यांनीच माहितीच्या अधिकारातून मिळवली आहे.
Web Title: mumbai news amitabh bachchan construction legal