अंधेरी - विरार लोकल आता पाचव्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - अंधेरीहून विरारला जाणाऱ्या लोकल उद्यापासून (ता. 29) पाचव्या क्रमांकाच्या रेल्वेमार्गावरून धावतील. हा जादा मार्ग सुरू झाल्याने अंधेरीहून विरारसाठी जादा गाड्या सोडता येतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल चर्चगेट येथून उद्या रिमोट कंट्रोलद्वारे या मार्गाचे उद्‌घाटन करणार आहेत.

पश्‍चिम रेल्वे मार्गावर वांद्रे टर्मिनसपासून बोरीवलीपर्यंत पाचवा रेल्वेमार्ग बऱ्याच वर्षांपूर्वीपासून आहे. मात्र, खऱ्या अर्थाने तो उपनगरी गाड्यांसाठी सांताक्रूझपासूनच उपलब्ध होतो. सध्या या मार्गावर केवळ लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. या मार्गावरून उपनगरी लोकल सोडण्याची मागणी प्रलंबित होती. अंधेरी आणि बोरीवली दरम्यानच्या तीन व चार क्रमांकाच्या जलदगती मार्गावर बोरीवली ते डहाणूपर्यंतच्या उपनगरी व लांब पल्ल्याच्या गाड्यांची मोठी वाहतूक असल्याने आता पाचव्या मार्गावरून जादा गाड्याही सोडता येतील.

Web Title: mumbai news andheri-virar local