अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्‍यकच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - मानधनावर सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्‍यक करण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचारी संपावर जाण्याची शक्‍यता असल्याने त्यांना महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा परिरक्षण 2017 (मेस्मा) लागू केला जाणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी संप पुकारल्यास "मेस्मा' लागू करण्याचे आदेश महिला आणि बालकल्याण विभागाने दिले आहेत. आरोग्यविषयक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास मदत करत असल्याने या सेवेला अत्यावश्‍यक सेवेत आणण्यात आले आहे.
Web Title: mumbai news anganwadi employee service