ॲनिमेटेड चिंटूची धमाल आता ‘यू ट्युब’वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई  - खट्याळ, मस्तीखोर अन्‌ खोडकर असला तरीही तितकाच लोभस असा चिंटू ‘सकाळ’च्या माध्यमातून घराघरात पोहोचला आणि सगळ्यांचा लाडका झाला. हाच चिंटू त्याच्या त्याच मस्तीसह आणि दोस्त मंडळीच्या साथीने पुन्हा एकदा बच्चे कंपनीच्या भेटीला येणार आहे. तेही ॲनिमेटेड रूपात अन्‌ सध्याच्या सर्वांच्या आवडीच्या सोशल मीडियावर. इंग्रजी कार्टून कॅरेक्‍टर्सच्या गर्दीत हरवलेल्या मुलांना मराठमोळ्या चिंटूचे पहिलेवहिले ॲनिमेडेट रूप १ ऑगस्टपासून यू ट्युब चॅनेलवर वेब सीरिजच्या माध्यमातून पाहता येणार आहे.

चिंटूने आपल्या करामतीतून अनेक वर्षे लहान मुलांबरोबरच थोरामोठ्यांनाही वेड लावले. वर्तमानपत्रानंतर चिंटू चित्रपट आणि फेसबुकवरच्या इंग्रजी सीरिजच्या माध्यमातून आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, पहिल्यांदाच तो ॲनिमेटेड रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. चिंटूच्या ॲनिमेटेड रूपासाठी आणि वेब सीरिजसाठी दीड वर्षापासून त्याचे निर्माते चारुहास पंडित आणि आरोह मीडिया यांचे काम सुरू होते. पंडित यांना ॲनिमेशनचाही अनुभव असल्याने चिंटूच्या निर्मितीला त्याचा फायदा झाला. चिंटूच्या आवाजासाठी फेसबुकद्वारे आवाहनही करण्यात आले होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. नवी मुंबईतील वेदांत आपटेने चिंटूला आवाज दिला आहे. स्टोरी बोर्ड तयार करून, त्यानुसार प्रत्येक एपिसोडची निर्मिती करण्यात आली आहे. 

चिंटूच्या वेब सीरिजचे सध्या ५० एपिसोड तयार करण्यात आले असून, १ ऑगस्टपासून दर मंगळवार व शुक्रवारी www.youtube/chintoo चॅनेलवर तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सध्या तरी चिंटूची सीरिज मराठीत दाखवली जाणार असून येत्या काळात अन्य भाषांचाही विचार केला जाईल. इतर कार्टूनच्या तुलनेत मराठमोळ्या चिंटूच्या ॲनिमेटेड रूपालाही प्रेक्षक उचलून धरतील, असा विश्‍वास निर्मात्यांनी व्यक्त केला. यावर सीरिज पाहता येतील.

चिंटू घराघरात प्रसिद्ध आहे. आज कार्टूनचे मुलांवर मोठ्या प्रमाणावर गारूड आहे. कार्टूनच्या गर्दीमध्येही चिंटू आपले वेगळेपण निश्‍चितच सिद्ध करील. सध्या तरी यू ट्युब सीरिजच्या माध्यमातून चिंटू दिसेल. पुढील काळात अशा प्रकारच्या सीरिज टीव्हीसाठीही बनवायला आवडेल.
- चारुहास पंडित  (निर्माता, चिंटू)

Web Title: mumbai news Animated Chintoo