मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोड येथील बहुचर्चित "ऍण्टिलिया' इमारतीच्या नवव्या मजल्यावरील बागेला सोमवारी रात्री आग लागली. फोर-जी मोबाईल टॉवरला लागलेली ही आग कृत्रिम गवतामुळे पसरली. अवघ्या 20 मिनिटांत ती विझवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून या मजल्यावरील विजेच्या वाहिन्या तात्काळ कापण्यात आल्या.

अंबानी यांच्या या निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावर रात्री 9.04 वाजता आग लागली. या बागेत फोर-जी मोबाईल टॉवर असून त्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीची ठिणगी पडली असावी, असा अंदाज आहे. तेथील कृत्रिम गवतामुळे आग वेगाने पसरली. अग्निशामक दलाचे बंब 9.13 वाजता पोचले. तोपर्यंत इमारतीतील अग्निशमन यंत्रणेच्या साह्याने आग आटोक्‍यात आणण्यात आली होती. 9.26 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली.

Web Title: mumbai news antilia building fire