एपीएमसीत वाहनचालकांची लूट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचाराच्या प्रकारांमुळे नेहमीच गाजली आहे. सध्या फळबाजारातील वसुली वाहनचालकांची डोकेदुखी बनली आहे. येथील आवक-जावक गेटवर बाजार समितीच्या ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतले जात आहेत. विशेष म्हणजे त्याची पावतीही दिली जात नाही. त्यामुळे हे पैसे नेमके कुणाच्या खिशात जातात, असा सवाल वाहनचालक आणि व्यापाऱ्यांनी केला आहे.

बाजार समितीच्या नियमानुसार मालाची गाडी आत सोडण्यासाठी पाच ते दहा रुपये शुल्क आकारले जाते. मात्र प्रवेशद्वारावरील कर्मचारी जादा पैसे घेतात. एखादी गाडी आत आली की ती ओव्हरलोडेड आहे, असे सांगून वेगळी पावती व दंड भरावा लागेल, असे सांगून ५० ते १०० रुपये घेतले जातात. एखादी गाडी सायंकाळी माल घेऊन आली, तर ती रिकामी होईपर्यंत रात्र होते. त्यामुळे वाहनचालक सकाळी गाडी बाहेर काढतो. त्या वेळी त्याच्याकडे पैशाची मागणी केली जाते. रात्रभर गाडी बाजारात का उभी केली? हे बेकायदा आहे, आता ५०० रुपये आणि तो भरायचा नसेल तर २०० रुपये द्या, असे सांगून २०० रुपये घेऊन वाहन सोडले जाते. अशा प्रकारे बाजाराच्या प्रवेशद्वारावर दररोज ५० ते ८० हजारांचा गल्ला जमवला जातो. तेव्हा या प्रकाराला समितीने आळा घालावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

फळ बाजारात झालेल्या या प्रकाराची माहिती अजून तरी माझ्यापर्यंत आलेली नाही. याबाबत माहिती घेतो. काय प्रकार आहे तो तपासून पाहतो. तुम्ही याबाबत सह सचिवांशी बोला.
- शिवाजी पहिणकर,  सचिव, बाजार समिती

बाजाराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी प्रवेश फी आणि बाहेर जाताना बाजार फी आकारली जाते. मात्र त्याची रितसर पावती दिली जाते. 
- अविनाश देशपांडे,  सहसचिव, बाजार समिती

Web Title: mumbai news apmc