एपीएमसीत पायाने होतात गाजरे साफ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - गाजर खाण्याचा डॉक्‍टरांकडून सल्ला दिला जातो. बाजारात मिळणारे गुलाबी गाजर कुठच्या दिव्यातून आपल्या घरी पोहचतात हे पाहिले तर ते खाताना तुम्ही अनेकदा विचार कराल. एपीएमसीतील घाऊक भाजीपाला बाजारात येणारे गाजर चिखलाने माखलेले असते. तिथे ते धुऊन साफ केले जातात; मात्र ती प्रक्रिया पायाने केली जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशी पद्धत बदलण्याची मागणी समितीकडे केली आहे.

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक भाजीपाला बाजारात दररोज १० ते १२ गाड्या गुलाबी गाजर येतात. राजस्थान, मध्य प्रदेश, इंदोर आदी ठिकाणाहून येणारी गाजरे चिखलात माखलेली असतात. त्यामुळे बाजारात आल्यावर ती पाण्याने धुतली जातात. त्यासाठी गाजरे पाण्याच्या पिंपात ओतले जातात. पूर्ण भिजल्यावर त्यांच्या भोवतीचा चिखल निघतो. त्यानंतर एक जण पिंपात उतरून गाजरांना पायाने मळून ती साफ करतो. वर्षानुवर्षे अशीच पद्धत अवलंबली जात आहे. आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून, पायाने गाजर साफ करणे योग्य आहे का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Web Title: mumbai news apmc Carrots