सफरचंद @ २००

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

नवी मुंबई - चिनी कृषी मालाला भारतीय बाजारपेठेत बंदी घातल्याने तेथून येणाऱ्या सफरचंदांची आवक बंद झाली आहे; परंतु इतर देशांमधून सफरचंदांची आवक होत असल्याने वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा घाऊक बाजार सावरला आहे. परंतु यामुळे त्यांचे दर २०० रुपये किलोच्या घरात गेले आहेत. १५ ऑगस्टपासून भारतीय सफरचंदे बाजारात दाखल होतील. त्यानंतर हे दर कमी होतील, असा विश्‍वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

हापूसनंतर बाजारात सफरचंदाला ग्राहकांची मोठी मागणी असते. वाशीच्या घाऊक बाजारात  आतापर्यंत चीन, न्यूझीलंड आणि अमेरिकेतून सफरचंदांची आवक होत होती. यात चिनी सफरचंदांचे प्रमाण २० ते २५ टक्के होते. परंतु ती आवक १ जूनपासून बंद झाली आहेत. त्यामुळे आता पोलंड, आर्जेन्टिना, इटली, स्पेन, अमेरिका आणि इराणमधून सफरचंदांची आवक सुरू झाली आहे. 

वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दररोज दोन हजार ५०० पेट्या सफरचंदांची उलाढाल होते. या पेट्या २० किलोच्या असतात. सफरचंदांचा हंगाम सहा महिन्यांचा असतो. परंतु कोल्ड स्टोरेजमध्ये ती साठवल्याने वर्षभर या फळांचा आस्वाद घेता येतो. मात्र त्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतात. भारतीय सफरचंदाचा हंगाम १५ ऑगस्टपासून सुरू होईल. त्यानंतर आवक वाढून त्याचे दर कमी होतील, अशी माहिती फळांचे आयातदार रवींद्र चाजने यांनी दिली. सध्या बाजारात सफरचंदाचे दर २०० रुपये किलो आहेत. एरवी हे दर शंभर रुपये असतात. जास्तीत जास्त ते १२० पर्यंत जातात. परंतु या वेळी ते दोनशेच्या घरात गेले आहेत.

Web Title: mumbai news apple

टॅग्स