ऑर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई - हत्येच्या गुन्ह्यात ऑर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या साबीर अली गरीबुल्ला शेख (वय 26) या आरोपीने रविवारी (ता. 4) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. साबीरचा मृतदेह रात्री नातेवाइकांकडे सोपवण्यात आला.

भंगार चोरीच्या गुन्ह्यात नाशिकच्या निफाड पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. त्यामधील आरोपी हे वसईला राहत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना ही माहिती दिल्याच्या संशयावरून वसीऊल्ला नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. या गुन्ह्यात साबीर अलीसह तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. साबीर अली हा ऑर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होता. गेल्या वर्षभरापासून तो तणावात होता. त्यामुळे त्याचे समुपदेशनही करण्यात आले होते. त्याचदरम्यान साबीर अलीने ऑर्थर रोड तुरुंगात दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Web Title: mumbai news arthur road jail prisoner suicide