आशा बगे यांना सेवाव्रती पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई - आयुष्यभर साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या, तसेच साहित्य क्षेत्रावर नाममुद्रा उमटवलेल्या व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यंदापासून "सेवाव्रती' पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांची निवड करण्यात आली आहे.

एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शेवाळकर यांच्या कुटुंबीयांनी प्रायोजित केलेला हा पुरस्कार बगे यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कारासाठीच्या निवड समितीत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, उपाध्यक्ष सुधाकर भाले, कार्यवाह इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे, महामंडळाच्या मराठवाडा साहित्य परिषदेचे न्या. नरेंद्र चपळगावकर, मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे यांचा समावेश होता.

Web Title: mumbai news asha bage sevavruti award