सलग सुट्यांमुळे एटीएममध्ये खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई - सलग सुट्यांमुळे बॅंका तीन दिवस बंद राहिल्याने "एटीएम' सेवेवर परिणाम झाला. अनेक बॅंकांच्या एटीएममधील रक्कम रविवारी संध्याकाळी संपल्याने दसऱ्याच्या खरेदीवर परिणाम झाला.

मुंबई - सलग सुट्यांमुळे बॅंका तीन दिवस बंद राहिल्याने "एटीएम' सेवेवर परिणाम झाला. अनेक बॅंकांच्या एटीएममधील रक्कम रविवारी संध्याकाळी संपल्याने दसऱ्याच्या खरेदीवर परिणाम झाला.

शनिवार आणि रविवारी दसऱ्यानिमित्त बाजारात खरेदीचा उत्साह होता. दोन दिवसांत एटीएममधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्यात आली. त्यामुळे बहुतांश एटीएममध्ये संध्याकाळनंतर खडखडाट झाला. अनेक एटीएममध्ये पैसे नसल्याच्या पाट्या लागल्या होत्या. तीन दिवस एटीएम व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांचेही कामकाज बंद असल्याने रक्कम भरता आली नाही, असे एका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: mumbai news atm empty by holiday

टॅग्स