"एटीएम'मध्ये भरायच्या 34 लाख रुपयांचा अपहार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पनवेल - "एटीएम'मध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेपैकी 34 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपक जाधव व रोहित गायकवाड अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. "सिक्‍युरीट्रन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी विविध बॅंकांच्या "एटीएम'मध्ये पैसे भरण्याचे  काम पाहते. तक्का येथे असलेल्या "एटीएम'मध्ये या कंपनीतर्फे कॅश लोडिंग ऑफिसर दीपक जाधव (वय 24) व रोहित गायकवाड (23) हे दोघे पैसे भरत असत. दोघांनीही संगनमत करून सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येकवेळी रक्कम "एटीएम'मध्ये न भरता काही रक्कम स्वतःकडे काढून ठेवली होती.

पनवेल - "एटीएम'मध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेपैकी 34 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपक जाधव व रोहित गायकवाड अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. "सिक्‍युरीट्रन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी विविध बॅंकांच्या "एटीएम'मध्ये पैसे भरण्याचे  काम पाहते. तक्का येथे असलेल्या "एटीएम'मध्ये या कंपनीतर्फे कॅश लोडिंग ऑफिसर दीपक जाधव (वय 24) व रोहित गायकवाड (23) हे दोघे पैसे भरत असत. दोघांनीही संगनमत करून सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येकवेळी रक्कम "एटीएम'मध्ये न भरता काही रक्कम स्वतःकडे काढून ठेवली होती. ही बाब कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. चौकशीत दोघांनीही 31 लाख 17 हजार 400 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. या संदर्भात अजिनाथ रामा यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

Web Title: mumbai news ATM panvel crime