एटीएम पिन विकणारे वेटर गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई - दारूच्या नशेतील ग्राहकांच्या पिन क्रमांकावरून बनावट एटीएमद्वारे पैसे लुबाडणाऱ्या टोळीचा वांद्रे पोलिसांनी पर्दाफाश केला. ग्राहकांच्या बोटावरून ते पासवर्ड ओळखत असायचे. एटीएमचा पिन आणि 14 डिजिट क्रमांकाकरता ते 1 हजार रुपये प्रतिनंबर विकायचे. खुर्शिद गफार अन्सारी आणि अब्दुल बशीर अन्सारी अशी त्या दोघांची नावे असून, ते पुण्यातील हॉटेलमध्ये वेटर आहेत. 

तक्रारदार हे उपनगरातील रहिवासी असून, त्यांचे एका खासगी बॅंकेत खाते आहे. मे महिन्यात त्यांच्या बॅंक खात्यातून 22 हजार 500 रुपये काढले गेल्याची तक्रार वांद्रे पोलिस ठाण्यात करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या पथकाने सुरू केला. मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून रिजवान मेहबूबअली सय्यद, मुशरफअली इफजतअली सय्यद, विकासकुमार साहूला तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीत खुर्शिद आणि अब्दुलचे नाव समोर आले. मुशफरअली हा म्होरक्‍या असून, त्याला 2015 मध्ये मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली होती. आरोपींकडून ग्राहकांचे नंबर असलेली वही, 50 विविध बॅंकांचे कार्ड, सॉफ्टवेअर, डाटा कोडिंग मशिन आणि 5 स्क्रीमर मशिन जप्त केल्या आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही टोळी ठाणे, पुण्यातील ग्राहकांची फसवणूक करत होती. 

एक क्रमांक एक हजाराचा 
विकास, खुर्शिद आणि अब्दुल हे ग्राहकांच्या डेबिट कार्डचे पिन क्रमांक आणि 14 अंकी क्रमांक नोंदवून घ्यायचे. ग्राहकाचा डेटा प्रति एक हजार रुपयांना ते मुशर्रफला विकायचे. दर आठ दिवसांनी मुशर्रफ हा आरोपींकडून डेटा घ्यायचा. त्याकरिता तो सार्वजनिक फोनवरून आरोपीच्या बारमध्ये फोन करून संपर्क साधायचा. वर्षभरापासून ते डेटा चोरीचे काम करायचे. 

ग्राहकाच्या बोटावरून ठरवायचे पिन क्रमांक 
आरोपी हे सोबत स्क्रीमर मशिन बाळगायचे. ग्राहकांनी कार्ड दिल्यानंतर ते प्रथम स्क्रीमर मशिनवर मारायचे. त्यानंतर दुसरी मशिन घेऊन ग्राहकांकडे यायचे. कधी कानोसा घेऊन तर कधी मशिनवरच्या क्रमांकावरून ते पिन कोडचा अंदाज बांधायचे, असे आरोपीनी पोलिसांना चौकशीत सांगितले. कित्येकदा फसवणूक झालेले ग्राहक हे कार्ड बदलतात; पण पिन बदलत नाहीत, असे आरोपींना वाटायचे. 

Web Title: mumbai news ATM PIN crime