मध्य रेल्वेमार्फत स्थानकांत नवीन 110 "एटीव्हीएम' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

मुंबई - तिकिटांसाठीच्या रांगा टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या "एटीव्हीएम' यंत्रणा वारंवार बंद पडत असल्यामुळे मध्य रेल्वेने नवीन 110 "एटीव्हीएम' खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांचा विस्तार हा सीएसएमटीपासून कर्जत, खोपोली, कसारापर्यंत आहे. या मार्गावरून दिवसाला सुमारे 40 ते 42 लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात "एटीव्हीएम' बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे प्रवाशांना स्मार्ट कार्डद्वारे तिकीट मिळते. मोबाईल तिकिटाची प्रतही या मशिनमधून मिळते.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकांत 500 पेक्षा अधिक "एटीव्हीएम'ची सोय आहे; परंतु त्यापैकी 30 ते 40 मशिनमध्ये सातत्याने बिघाड होतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रेल्वेने नवीन 110 "एटीव्हीएम' खरेदीचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण याचबरोबर बदलापूर, अंबरनाथ, वडाळा, चेंबूर, वाशी या रेल्वे स्थानकांत सर्वात अधिक "एटीव्हीएम'चा वापर होतो. तेथेच नवीन मशिन बसवण्यात येणार आहेत. 

Web Title: mumbai news atvm machine railway