बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त पालिकेतर्फे सुविधा

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त पालिकेतर्फे सुविधा

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनाननिमित्त (१७ नोव्हेंबर) मुंबई महापालिकेतर्फे शिवाजी पार्कवर सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय सोमवारी (ता. ६) महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. खास व्हीआयपीच्या मंडपाचा खर्चही महापालिका करणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना आतापर्यंत शिवसेना सुविधा पुरवत होती; मात्र पहिल्यांदाच हा खर्च पालिकेमार्फत करण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीच्या व्यवस्थेसाठी झालेल्या पाच लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात आला होता. त्याबाबत गदारोळ झाल्यानंतर शिवसेनेने हा खर्च पालिकेला दिला होता; मात्र स्मृतिस्थळावर लावण्यात आलेल्या गॅसच्या ज्योतीसाठी पालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करत आहे. शिवसेना सुविधा पुरवतेच, पण दरवर्षी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी पालिकेमार्फत सुविधा पुरवल्या जाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. तिला प्रशासनाने मंजुरी दिल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले.

दोन हजार चौरस मीटरचा मंडप
शिवाजी पार्क येथे स्मृतिदिनासाठी दोन हजार चौरस फुटांचा मंडप बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्मृतिस्थळाचे लॅण्डस्केपिंग (सुशोभीकरण) करण्यात येणार आहे, तसेच रांगेत उभे राहणाऱ्यांसाठी स्टेज, पिण्याचे पाणी, अग्निशमन दलाचा बंब, रुग्णवाहिका आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. हा सर्व खर्च पालिका करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com