बॅंक खात्यातील 27 कोटी काढण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुंबई - चेंबूर येथील एका कंपनीच्या बॅंक खात्यातील 27 कोटींची रक्कम काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या समरसिंग भगवानसिंग रेवारी (वय 37) याला सायबर पोलिसांनी शुक्रवारी जयपूरहून अटक केली. तो राजस्थानातील गोविंदनगर येथील रहिवासी आहे. 

साफ ईस्ट कंपनीचे एका खासगी बॅंकेच्या चेंबूर येथील शाखेत बॅंक खाते आहे. त्यात 27 कोटींची रक्कम जमा होती. कंपनीचे संचालक अरुणाचलम मुथू आणि त्यांचा मुलगा अरुणाचलम मुथ्थू मुथैय्या या दोघांच्या स्वाक्षरीनेच या खात्यातील व्यवहार होत होते. हे खाते 2009 पासून वापरात नव्हते. आरोपींनी 2017 मध्ये कंपनीचा पत्ता बदलल्याची बनावट कागदपत्रे बॅंकेत सादर केली; मात्र याबाबत वेळीच कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. 

Web Title: mumbai news bank chembur