डोंबिवलीः सासूने केली जावयाची गळा आवळून हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

डोंबिवलीः डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथे गुरूवारी (ता. 27) रात्री सासूनेच आपल्या जावयाची गळा आवळून निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिता चांदू वळंदे (वय 52) हिला तात्काळ मुंब्र्यातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. अनिता हिला आज (शुक्रवार) कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी तिला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रवी रमेश सोलंकी (वय 25) असे मृत जावयाचे नाव आहे. तो ठाकूरवाडीतील फुलेनगर झोपडपट्टीत राहतो. फुटपाथवर फूल विक्री करणाऱ्या रवीचे लग्न मुंब्र्यातील रेतीबंदरला असलेल्या पंजाबी कॉलनीत राहणाऱ्या सोनाबाई (वय 23) हिच्याशी 2 वर्षांपूर्वी झाला होता. 10 महिन्यापूर्वी गर्भवती असलेली सोनाबाई मुंब्रा येथे आपल्या माहेरी राहत होती. चार महिन्यापूर्वी तिची प्रसूती होऊन तिला जुळी मुले झाली. मात्र, चार महिने उलटूनही पत्नी सासरी येत नसल्याने गुरुवारी (ता. 28) सकाळी रवी सासुरवाडीला गेला आणि आपली मुले घेऊन डोंबिवलीत दुपारच्या सुमारास परतला. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अनिता आणि सोनाबाई  या डोंबिवलीत रवीच्या घरी आल्या. यावेळी सोनाबाई ही मुलांना घेऊन घराबाहेर पळाली तर अनिता हीने रविचा गळा आवळून त्याची हत्या केली. याप्रकरणी मृत रवी याची आई मनुबाई सोलंकी यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी अनिता हिला अटक करण्यात आली आहे. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री

Web Title: mumbai news to be killed by mother-in-law in dombivli