जुईनगरमध्ये डेंगीचे १२ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

बेलापूर - जुईनगर सेक्‍टर २२ मधील रेल्वे वसाहतीत डेंगीचे १२ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे कॉलनीत पडलेले कचऱ्याचे ढीग, वाढलेले गवत, रासायनिक सांडपाण्याच्या नाल्याची दुर्गंधी यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबतची बातमी २२ जुलैला ‘सकाळ’ने दिली होती; परंतु त्यानंतरही रेल्वेने याकडे लक्ष दिलेले नाही.

जुईनगर सेक्‍टर २२ मध्ये मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बांधली आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेने या वसाहतीमधील इमारतींची देखभाल व दुरुस्ती न केल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. नगरसेवकांच्या प्रयत्नांमुळे पालिकेने वसाहतीच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्या ठेवल्या असतानाही तेथील रहिवासी वाटेल तेथे कचरा फेकत आहेत. 

रेल्वेने कॉलनीत सफाई कामगार ठेवले आहेत; परंतु ते वेळेवर कचरा उचलत नसल्याने त्याचे ढीग तयार झाले आहेत. पावसात तो कुजल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे वसाहतीत साथींचा फैलाव होतो; परंतु या वेळी डेंगीचे १२ संशयित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिका येथे औषध आणि धूर फवारणी करत नसल्याने साथींचा फैलाव होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. वसाहतीत आता डेंगीचे रुग्ण सापडल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: mumbai news belapur dengue health