पावसाळी शेड नियमित करा - गणेश नाईक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

बेलापूर - ऊन, वारा आणि पावसापासून इमारतीचे रक्षण व्हावे यासाठी शहरातील अनेक सोसायट्यांनी इमारतींच्या छतावर गरजेपोटी पावसाळी शेड बांधल्या आहेत. त्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. तेव्हा त्या अधिकृत करण्यासंदर्भात महापालिकेने ठराव संमत करून राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेला केली आहे. 

बेलापूर - ऊन, वारा आणि पावसापासून इमारतीचे रक्षण व्हावे यासाठी शहरातील अनेक सोसायट्यांनी इमारतींच्या छतावर गरजेपोटी पावसाळी शेड बांधल्या आहेत. त्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. तेव्हा त्या अधिकृत करण्यासंदर्भात महापालिकेने ठराव संमत करून राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेला केली आहे. 

नवी मुंबईतील पावसाळी शेड बांधलेल्या इमारती आणि सोसायट्यांना महापालिकेने नोटिसा पाठवून ते हटवण्यास सांगितले आहे. त्यामुळे या सोसायट्यांमधील रहिवाशांनी गणेश नाईक यांची भेट घेतली. पावसात छत गळत असल्याने शेड बांधल्या असल्याचे त्यांनी नाईक यांना सांगितले. त्यानंतर नाईक यांनी याविषयी महापौर सुधाकर सोनवणे यांच्याशी चर्चा करून पावसाळी शेड नियमित करण्याचा ठराव पालिकेच्या आगामी महासभेत मांडून तो मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे पावसाळी शेड नियमित करण्याची प्रक्रिया पालिका स्तरावर लवकरच सुरू होणार असल्याने शहरातील लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. सिडको आणि खासगी विकसकांनी बांधलेल्या या इमारती निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्या मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात त्यांचे छत गळते. त्यामुळे पावसाळी शेड बांधली आहेत. विकास नियंत्रण नियमावलीत ती बेकायदा ठरतात; परंतु त्यांचा व्यावसायिक वापर कुणीही करत नाही. त्यामुळे ती नियमित करावी, अशी मागणी रहिवाशांनी नाईक यांच्याकडे केली. त्यानुसार त्यांनी महापालिकेला ठराव करून तो सरकारकडे पाठवण्याची सूचना केली.

नवी मुंबई महापालिकेने पावसाळी शेड बेकायदा ठरवून कारवाईची नोटिस पाठवल्यामुळे रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कारण यातील अनेक इमारती मोडकळीस आल्या असल्याने पालिकेने कारवाई केली तर त्या कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी पावसाळी शेड नियमित करण्यासाठी पालिकेच्या महासभेत प्रस्ताव आणण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तसा प्रस्ताव लवकरच आणण्यात येईल.
- सुधाकर सोनवणे, महापौर सोनवणे

Web Title: mumbai news belapur ganesh naik