भाड्याने बस घेतल्यास अनुदान शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई - बेस्टने भाड्याच्या बस चालवल्यास अनुदान देणे शक्‍य आहे, अशी भूमिका गुरुवारी (ता. 8) महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मांडली. सामान्यांना माफक दरात सुविधा देण्यासाठी बेस्टला अनुदानाची गरज आहे. मात्र, अकार्यक्षमतेसाठी अनुदान दिले जाणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. अनुदानबाबत साडेतोड भूमिका मांडून आयुक्तांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आव्हान दिले आहे. 

मुंबई - बेस्टने भाड्याच्या बस चालवल्यास अनुदान देणे शक्‍य आहे, अशी भूमिका गुरुवारी (ता. 8) महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मांडली. सामान्यांना माफक दरात सुविधा देण्यासाठी बेस्टला अनुदानाची गरज आहे. मात्र, अकार्यक्षमतेसाठी अनुदान दिले जाणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. अनुदानबाबत साडेतोड भूमिका मांडून आयुक्तांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आव्हान दिले आहे. 

ऑब्झर्व्हर रिसर्च फांऊडेशनच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात अजोय मेहता यांनी पालिकेच्या 2018-19 या वर्षाच्या अर्थसंकल्पांचे विश्‍लेषण केले. या वेळी त्यांनी पुन्हा एकदा बेस्टच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले. बेस्ट उपक्रमाला एक किलोमीटर बस चालवण्यासाठी 100 रुपये खर्च येतो. त्याऐवजी खासगी बसेस वापरल्यास हा खर्च 60 रुपये येईल. त्यामुळे भविष्यात बसेस भाड्याने घेऊन चालविण्याशिवाय पर्याय नाही, असेही आयुक्तांनी सांगितले. खासगी बस भाड्याने घेण्याच्या बेस्टच्या निर्णयाविरोधात कामगार संघटनांनी न्यायालयात धाव घेतली. खासगी बसेस वापरल्यास प्रत्येक किलोमीटरसाठी 60 रुपये खर्च येईल. त्यातील 30 रुपये प्रवाशांकडून घेऊन उर्वरीत 30 रुपयांचे अनुदान देता येईल. मात्र, स्वत:च्या बसेस चालवून 100 रुपयांपैकी 70 रुपये अनुदान देणे शक्‍य नाही अशी आकडेवारीही त्यांनी मांडली. 

बेस्टने महापालिकेकडे मागितलेल्या अनुदानाबाबत बोलताना मेहता म्हणाले, "जगात सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी अनुदान द्यावे लागते. त्यामुळे होणारे फायदे लक्षात घेता बेस्टलाही अनुदान द्यायलाच हवे. पालिकेने 35 बंद झालेल्या शाळा खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले. 

मैदानात व्यासपीठ नको 
मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने, उद्याने हा कळीचा मुद्दा आहे. मैदानांमध्ये सभागृह, व्यासपीठ बांधून अतिक्रमण केले जात आहे. त्याबाबतही आयुक्त अजोय मेहता यांनी परखड भूमिका मांडली. मैदाने ही खेळण्यासाठी आहेत. त्यात सभागृह आणि व्यासपीठाची गरज नाही, असे त्यांनी ठणाकावून सांगितले. 

अतिक्रमण टाळण्यासाठी नद्यांना भिंती 
संरक्षणाच्या नावाखाली नद्यांमध्ये कॉंक्रिटीकरण होत असल्याबद्दल विचारले असता आयुक्त अजोय मेहता म्हणाले, "नद्यांच्या दोन्ही किनाऱ्यांवर भिंती बांधल्याशिवाय होणारे अतिक्रमण आणि टाकण्यात येणारा कचरा कमी होणार नाही.'

Web Title: mumbai news best bus munipal commissioner