भांडुप पोटनिवडणुकीनंतर चमत्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई  - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 116 मध्ये (भांडुप) बुधवारी (ता.11) होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर चमत्कार घडण्याच्या वल्गना भाजपचे नेते-कार्यकर्ते करीत आहेत. ही निवडणूक जिंकून 2019 मध्ये पालिकेत सत्तांतर घडणार असल्याचा दावा भाजप करत आहे; मात्र शिवसेनेचे संख्याबळ पाहता पालिकेतील सत्तेला धोका नसला, तरी समित्यांमध्ये शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

कॉंग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. हा प्रभाग प्रमिला पाटील यांच्या कुटुंबाचा गड मानला जातो. त्यांची सून जागृती पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे; तर शिवसेनेतर्फे आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेसने प्रमिला सिंह यांना उमेदवार दिली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे रिंगणाबाहेर आहेत. 

ही जागा जिंकल्यास 2019 मध्ये मुंबईचे महापौरपद मिळवू, असा दावा भाजप करीत आहे. भाजपने ही पोटनिवडणूक जिंकल्यास भाजप आणि शिवसेनेच्या संख्याबळात फक्त तीन नगरसेवकांचा फरक उरेल. त्या आधारावर हा दावा केला जात आहे; मात्र ही निवडणूक शिवसेनाच जिंकणार आहे. त्यामुळे महापौरपद मिळवणे हे भाजपचे स्वप्नच राहील, असा चिमटा शिवसेना काढत आहे. महापौरपद मिळवण्यासाठी भाजपला मोठी राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत. मात्र एक सदस्य वाढल्यास समित्यांमधील सदस्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. ही संख्या वाढल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते. 

संख्याबळ 
- भाजपचे नगरसेवक (अपक्षांसह) - 84 (माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त) 
- शिवसेनेचे नगरसेवक (अपक्षांसह) - 88 (शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या एका अपक्षाचे पद रद्द होऊन तेथे शिवसेनेच्या सदस्याची निवड होण्याची शक्‍यता आहे.) 

Web Title: mumbai news Bhandup by-election