Bharat Gaurav Train : तारीख ठरली! धार्मिकस्थळे दाखवणारी 'भारत गौरव ट्रेन' मुंबईतून धावणार | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharat gaurav train

Bharat Gaurav Train : तारीख ठरली! धार्मिकस्थळे दाखवणारी 'भारत गौरव ट्रेन' मुंबईतून धावणार

मुंबई, : देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने भारत गौरव ट्रेन सुरु केली आहे. आता भारत गौरव ट्रेन मुंबईवरून २३ मे २०२३ रोज धावणार आहे. मुंबई-मैसूरु-बेंगळुरू-कन्याकुमारी-तिरुवनंतपुरम-रामेश्वरम-मदुराई-तिरुपती-मुंबई दरम्यान धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीद्वारे चालवली जाणारी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन, मंगळवारी २३ मे २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल, गोलाकार मार्गाने प्रवास करेल आणि २ जून २०२३ रोजी परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला पोहोचेल.

मुंबई-मैसूरु-बेंगळुरू-कन्याकुमारी-तिरुवनंतपुरम-रामेश्वरम-मदुराई-तिरुपती पर्यत धावणार आहे. या भारत गौरव ट्रेनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलबुर्गी (बोर्डिंग स्टेशन); म्हैसूर, बंगलोर, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, रामेश्वरम, मदुराई, तिरुपती (प्रवासाचा कार्यक्रम) आणि परत कलबुर्गी, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर समाप्त होणार आहे.

भारतीय रेल्वेने आता धार्मिक पर्यटनावर भर दिला आहे. धार्मिक पर्यटनासाठी रेल्वेकडून विशेष पर्यटन गाड्या सोडल्या जात आहेत. याचबरोबर धार्मिक यात्रांचे आयोजनही रेल्वेकडून केले जात आहे. रेल्वेने धार्मिक पर्यटनासाठी भारत गौरव यात्रा सुरू केली आहे.

या सेवेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना कमी पैशांमध्ये देशातील विविध पर्यटनस्थळे, धार्मिक तीर्थस्थळे, ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळत आहेत.