भारत पेट्रोलियमला महारत्न दर्जा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई - तेल आणि वायू क्षेत्रातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला (बीपीसीएल) नुकताच महारत्न दर्जा मिळाला. सरकारने निश्‍चित केलेल्या कठोर नियमांची पूर्तता केल्यानंतर हा दर्जा मिळवणारी बीपीसीएल ही आठवी कंपनी ठरली आहे. महामंडळाने पुढील पाच वर्षांसाठी एक लाख कोटींचे भांडवली गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले असून यात उत्पादन क्षमता वाढवणे, नव्या प्रकल्पांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

 नुकतीच ‘बीपीसीएल’ची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये महामंडळाच्या पुढील योजना आणि विस्ताराची माहिती देण्यात आली. महामंडळ पुढील पाच वर्षांत १.०८ लाखकोटींचा भांडवली खर्च करणार आहे. हा खर्च तेलशुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता वाढवणे, विपणन यंत्रणा मजबूत करणे तसेच जागतिक पातळीवरील नव्या कंपन्यांवर ताबा मिळवण्याकरिता करण्यात येईल, असे ‘बीपीसीएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. राजकुमार यांनी सांगितले.  महारत्न दर्जा महामंडळाला अल्प दरात निधी उभारण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. शिवाय व्यवस्थापनाला वित्तीय निर्णयाचे स्वातंत्र्य मिळेल, असे राजकुमार यांनी सांगितले.  कोणत्याही एका प्रकल्पात किमान पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता देण्याचे अधिकार व्यवस्थापनाला मिळाला आहे. महामंडळाची उत्पादन क्षमता ११२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे त्यांनी सांगितले. 

दहा हजार कोटी नफा मिळवणार
२०१६-१७ या आर्थिक वर्षात महामंडळाला ८०३९.३० कोटींचा नफा झाला. या वर्षात महामंडळाने ३२५ टक्के लाभांश दिला. वर्षभरात बाजार भांडवल एक लाख कोटींवर गेले. चालू वर्षात १० हजार कोटींचा नफा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे राजकुमार यांनी सांगितले.

Web Title: mumbai news Bharat Petroleum