भातसा धरणाचे दरवाजे एक मीटरने उघडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

शहापूर - शहापूर तालुक्‍यात शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधारेने धुमाकूळ घातला असतानाच रविवारी दुपारी भातसा धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडल्याने किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी, नाल्यांचा प्रवाह वाढला असतानाच रविवारी दुपारी जलसंपदा विभागाने भातसा धरणाचे दरवाजे उघडल्याने भातसा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी किनारी सरलांबे, सापगाव, खुटघरसह अनेक गावांत पुराचे पाणी घुसण्याची शक्‍यता असल्याने शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कर आणि शहापूरचे पोलिस निरीक्षक महेश शेट्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

Web Title: mumbai news Bhatsa dam rain