Mumbai : प्रवाशांना मोठा दिलासा! पश्चिम रेल्वेवर आणखी ५० उन्हाळी विशेष गाड्या

Train
Trainesakal

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-बरौनी जंक्शन, अहमदाबाद-दरभंगा आणि अहमदाबाद-समस्तीपूर जंक्शनदरम्यान ५० विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

Train
Sharad Pawar: राजीनाम्याचा विषय संपला! आता पवार विरोधकांच्या एकजुटीत व्यस्त; म्हणाले...

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९०६१/०९०६२ मुंबई सेंट्रल-बरौनी स्पेशल (१८ फेऱ्या) असेल. ट्रेन क्रमांक ०९०६१ बरौनी जंक्शन स्पेशल मुंबई सेंट्रलहून दर मंगळवारी सकाळी ११ वाजता सुटेल. गुरुवारी सकाळी सहा वाजता ती बरौनी जंक्शनला पोहोचेल.

९ मे ते ४ जुलै २०२३ पर्यंत ही ट्रेन धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०६२ बरौनी जंक्शन - मुंबई सेंट्रल स्पेशल बरौनी जंक्शनवरून दर शुक्रवारी रात्री १०. ३० वाजता सुटेल आणि रविवारी मुंबई सेंट्रलला संध्याकाळी ६.२० वाजता पोहोचेल.

Train
Tourism : पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगार देणारे 'आई' धोरण तयार; वित्तपुरवठ्यासाठी...

ही ट्रेन १२ मे ते ७ जुलै २०२३ पर्यंत धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०९४२१/०९४२२ अहमदाबाद - दरभंगा स्पेशल १६ फेऱ्या आणि ट्रेन क्रमांक ०९४१३/०९४१४ अहमदाबाद-समस्तीपूर स्पेशल १६ फेऱ्या असणार आहेत. सर्व उन्हाळी विशेष गाड्यांचे आरक्षण ६ मेपासून रेल्वेच्या सर्व केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावरून सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com