भाजप प्रदेश सचिवपदी सुरेश शाह

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी पक्षाच्या प्रदेश सचिवपदी सुरेश खिमराज शाह यांची नियुक्ती केली आहे. सुरेश शाह हे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. जीव दया, शिक्षण क्षेत्र, गोसेवा आदी क्षेत्रांमध्ये ते सक्रिय आहेत. राजस्थानमधील जैन समाजाच्या "जन जन की आस्था', केंद्र पवित्र नाकोडा तीर्थचे विश्वस्त आहेत. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
Web Title: mumbai news bjp state Secretary suresh shah