मृताच्या मनगटाला पालिकेची काळी पट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतदेहांच्या कपाळावर क्रमांक लिहिल्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर यापुढे मृतदेहाच्या मनगटाला काळी पट्टी बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मोठ्या दुर्घटनेच्या वेळी रुग्णालयात करावयाच्या उपाययोजनांची यादीच तयार करण्यात येणार आहे. या पर्यायाचा विचार राज्यातील सर्व रुग्णालयांत केला जाण्याची शक्‍यता आहे.

एल्फिन्स्टन येथील रेल्वेच्या पादचारी पुलावर सप्टेंबरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. केईएम रुग्णालयात मृतांची ओळख पटावी, यासाठी त्यांच्या कपाळावर क्रमांक लिहिण्यात आले होते. यामुळे रुग्णालय आणि महापालिकेवर टीका झाली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अशा मोठ्या दुर्घटनेच्या वेळी रुग्णालयात करावयाच्या उपाययोजनांबाबत आराखडा तयार करण्यासाठी केईएम रुग्णालयाने समिती नेमली होती. समितीने उपाययोजनांची यादी तयार केली आहे. मृतदेहाच्या मनगटाला यापुढे काळी पट्टी लावण्यात येणार आहे. गंभीर जखमींच्या मनगटाला लाल आणि किरकोळ जखमींच्या मनगटाला पिवळी पट्टी बांधली जाईल.

Web Title: mumbai news black ribbon to death body