'स्ट्रीट फूड हब'साठी 65 जागा ठरल्यात, तोंडाला पाणी आणणाऱ्या मुंबईतील स्ट्रीट फूडसाठी BMC ची भन्नाट योजना

'स्ट्रीट फूड हब'साठी 65 जागा ठरल्यात, तोंडाला पाणी आणणाऱ्या मुंबईतील स्ट्रीट फूडसाठी BMC ची भन्नाट योजना

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि मुंबई येणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी. कारण मुंबई महानगरपालिका आता येत्या काही दिवसात मुंबईत स्ट्रीट फूड हब उभारण्याच्या तयारीत आहे. मुंबईत स्ट्रीट फूड हब उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 65 ठिकाणे शोधली आहेत. ज्यात 3,331 विक्रेत्यांचा समावेश केला जाणार आहे. या 65 ठिकाणांच्या मदतीने मुंबईतील विक्रेते फूड ट्रक्स किंवा सामान्य स्टॉल्समध्ये विविध प्रकारचे अन्नपदार्थ विकू शकणार आहेत.

मुंबई महापालिकेकडून राबवली जाणारी ही योजना म्हणजे मुंबईतील फूड ट्रक योजनेचा विस्तार असणार आहे. खरंतर मागील वर्षातच मुंबई महापालिकेकडून याबाबतचा मसुदा तयार केला होता. महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील या योजनेवर लक्ष केंद्रित केलंय. 

2021-22 च्या अर्थसंकल्पात, मुंबई महापालिकेने फूड हब तयार करण्यासाठी आणि फुटपाथ सुशोभित करण्यासाठी उड्डाणपूल आणि उड्डाणपुलांखालील जागांसाठी 200 कोटी प्रस्तावित केले आहेत. 

याबाबत माहिती देताना मुंबईचे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणालेत की, "आम्ही शहरातील  विविध 65 ठिकाणाची फूड हबसाठी निवड केली आहे. ज्याअंतर्गत  3,331 विक्रेत्यांना संध्याकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत फूड ट्रक सुरु ठेवता येणार आहे."

गेल्या वर्षीच मुंबई महापालिकेने तयार केलेल्या मसुद्यानुसार या योजनेअंतर्गत फूड ट्रक मालकांना विविध ठिकाणांवर अन्नपदार्थांची विक्री करता येणार आहे. 

दरम्यान, या फूड ट्रक्सवर किंवा गाळ्यांमध्ये अन्नपदार्थांच्या विक्रीव्यतिरिक्त अन्य काहीही विकता येणार नाही. यासाठी फूड किंवा विविध गाळ्यांच्या मालकांना महापालिकेचा आरोग्य विभाग, परवाना आणि  दुकाने व आस्थापने विभाग तसेच वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागेल.

BMC च्या 2021-22 मधील अर्थसंकल्पीय भाषणानुसार, "सर्वाधिक स्वच्छता आणि स्वच्छताविषयक मानदंड पूर्ण करणाऱ्या लोकप्रिय स्ट्रीट फूड विक्रीस 65 ठिकाणी विक्रीस अनुमती दिली जाईल, जिथे एका वेळी 30 विक्रेत्यांना क्लस्टर परवानगी असेल.

Mumbai news BMC identifies 65 locations for street food hubs across city


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com