तोतया एजंटविरोधात कठोर कारवाई करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - वीजजोडणी, नावातील बदल, पत्ताबदल या कामासाठी महावितरणने कोणतेही एजंट नेमले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे एजंट आढळल्यास महावितरणच्या कार्यालयात माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तोतया एजंटविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने विशेष मदत कक्षाची स्थापना केली आहे.

महावितरणने एप्रिल 2017 पासून विशेष मदत कक्ष सुरू केला आहे. या कक्षाकडे एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान सुमारे 3,150 ग्राहकांनी संपर्क साधला आहे. यातील 450 ग्राहकांनी नवीन वीजजोडणीसंबंधात; तसेच दोन हजार 700 ग्राहकांनी नावात बदल करण्याबाबत या विशेष कक्षाकडे चौकशी केली. ज्या ग्राहकांनी महावितरणकडे कागदपत्रे सादर केली, अशा 166 ग्राहकांना तत्परतेने नवीन वीजजोडणी दिली. तसेच 63 ग्राहकांच्या नावात तातडीने बदल करून दिला आहे. या कक्षाचा ग्राहकांनी जास्तीत जास्त उपयोग करून त्यांच्या समस्यांचे निवारण करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. नवीन वीजजोडणी, नावात बदल व वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांनी तक्रार सोडविण्यासाठी महावितरण मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे 022-26478989, 022-26478899 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

54 ग्राहकांना तत्परतेने वीजजोडणी
महावितरणने ऑगस्ट 2017 पासून "कनेक्‍शन ऑन कॉल' ही सेवा सुरू केली आहे. या सेवेंतर्गत ग्राहकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजजोडणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या सेवेंतर्गत 97 ग्राहकांनी मदत कक्षाकडे चौकशी केली. यातील ज्या भागात महावितरणच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत्या, अशा 54 ग्राहकांना घरी जाऊन तत्परतेने वीजजोडणी दिली आहे.

Web Title: mumbai news bogus agent crime mahavitaran

टॅग्स