मोदींवरील पुस्तकाचे मुंबईत आज प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षांतील कारकिर्दीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 13) सायंकाळी 6 वाजता "राज भवन'मध्ये होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील.

'मार्चिंग विथ अ बिलियन - अनालायझिंग नरेंद्र मोदीज गव्हर्न्मेंट ऍट मिडटर्म' हे पुस्तक वरिष्ठ पत्रकार उदय माहूरकर यांनी लिहिले आहे. "पेंग्विन रॅण्डम हाऊस'ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक क्‍लाऊज श्‍वॉब यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. अफगाणिस्तानचे पंतप्रधान घनी, बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना, फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद, इन्फोसिसचे संस्थापक के. आर. नारायणमूर्ती आदींनी या पुस्तकाची प्रशंसा केली आहे. या पुस्तकात मोदी यांच्या कारकिर्दीच्या विविध पैलूंचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण आहे. त्यांच्या विकासविषयक दृष्टिकोनाचा अतिशय साक्षेपी आढावा घेण्यात आला आहे. कार्यक्रमास प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य, भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: mumbai news book publication on modi