पित्याला यकृत दान करीत 'ती' ठरली 'ब्रेव्ह गर्ल'

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई: लडका 'खानदान का चिराग' तो लडकी 'पराया धन' या भारतीय मानसिकतेला 'ती'ने चांगलाच धडा शिकवीत मुलगी म्हणजे फक्त पराया धन नसून, ती जीवनदायिनी सुद्धा आहे हे दाखवून दिले. या संदर्भात एक फारच सुंदर आणि विशेषतः मुलगाच हवा असे आळवना-या महिला वर्गाचे डोळे उघडणारी एका शुर मुलीची पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाली असून, त्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईत राहणाऱ्या पूजा बिर्जानिया या धाडसी कन्येने यकृत निकामी झाल्याने आपल्या यकृतातील काही भाग पित्याला देऊन जीवनदान दिले आहे. झारखंड येथील हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. रचित भूषण श्रीवास्तव यांनी ही पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून जगा समोर आणली आहे.
भारतीय समाजात खास करुन महिला आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा हवाच असा हट्ट धरतात. त्यामुळे देशात स्त्री भ्रुण हत्यांचे प्रमाण वाढले असून देश पातळीवर सरकार आणि विविध संस्था संघटनांमार्फत बेटी बचाओ मोहीम राबवत आहे. या मोहिमेची ही "शुर कन्या" एक प्रकारे अघोषित राजदूतच ठरली आहे, असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही.

मुलींना डोक्यावरील ओझे समजू नका. मुलगा व्हावा यासाठी देवाला नवस, स्त्री भ्रूण ह्त्या असे प्रकार न करता मुलीला जन्माला येऊ दया. तिचे स्वागत करा. असा संदेश देण्यासाठी ही पोस्ट अत्यंत मोलाची ठरत आहे.

Web Title: mumbai news brave girl pooja Brijania gives liver to father