मतदार दाखल्यासाठी लाच घेताना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - मतदार यादीत नाव असल्याचा प्रमाणित दाखला देण्यासाठी 2200 रुपयांची लाच घेताना चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला सोमवारी अटक करण्यात आली. संताजी पांडुरंग कावर (वय 46) हा कर्मचारी मतदार नोंदणी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर होता. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी तक्रारदाराला 1995च्या यादीत नाव असल्याचा पुरावा हवा होता. त्यासाठी त्याने चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या कांदिवली येथील कार्यालयात 13 जुलैला अर्ज केला होता; परंतु पाच जणांचा मतदार नोंदीचा दाखला देण्यासाठी कावर याने प्रत्येकी 500 रुपये मागितले होते.

मुंबई - मतदार यादीत नाव असल्याचा प्रमाणित दाखला देण्यासाठी 2200 रुपयांची लाच घेताना चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला सोमवारी अटक करण्यात आली. संताजी पांडुरंग कावर (वय 46) हा कर्मचारी मतदार नोंदणी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर होता. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी तक्रारदाराला 1995च्या यादीत नाव असल्याचा पुरावा हवा होता. त्यासाठी त्याने चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या कांदिवली येथील कार्यालयात 13 जुलैला अर्ज केला होता; परंतु पाच जणांचा मतदार नोंदीचा दाखला देण्यासाठी कावर याने प्रत्येकी 500 रुपये मागितले होते. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली. एसीबीने कावरला सापळा रचून अटक केली.

Web Title: mumbai news bribe