तीन हजार इमारतींची तपासणी 60 हून अधिक हॉटेल सील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल दुर्घटनेनंतर मुंबईत पालिकेने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत तीन हजार इमारतींची तपासणी केली. यात सुमारे 60 हॉटेल सील केली. आज 14 अतिक्रमणे पाडली असून, आणखी एक हॉटेल सील केल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या दोन दिवसांत 548 आस्थापनांपैकी पालिकेने केवळ 14 ठिकाणची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. एक हॉटेल सील केले; तर नियम धाब्यावर बसविणाऱ्या 322 आस्थापने आणि उपाहारगृहे तपासून आवश्‍यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. आतापर्यंत तीन हजारहून अधिक बांधकामांची तपासणी करून हजार बांधकामे तोडली; तर सुमारे 60 हून अधिक हॉटेलांना सील केले. काहींची तपासणी करून त्यांत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन दिवसांत 548 उपाहारगृहांची तपासणी केली. यात 322 आस्थापनांना आणि उपाहारगृहांना तपासणी अहवाल देण्यात आला. कुर्ला पश्‍चिम येथील अग्निकांड झालेल्या दीपक फरसाणला सील ठोकले. याव्यतिरिक्त अनधिकृतपणे साठा केलेले 166 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

Web Title: mumbai news building cheaking hotel seal by municipal