व्यवसाय परवाना मिळवा घरबसल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुंबई - महापालिकेचा व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी अर्ज करणे, शुल्क भरणे, परवाना मिळवणे आदी कामे घरबसल्या ऑनलाईन करणे शक्‍य होणार आहे. 

मुंबई - महापालिकेचा व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी अर्ज करणे, शुल्क भरणे, परवाना मिळवणे आदी कामे घरबसल्या ऑनलाईन करणे शक्‍य होणार आहे. 

इझ ऑफ डुईंग बिझिनेस अंतर्गत महापालिका ऑनलाईन एक खिडकी योजना सुरू करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयात जाण्याची गरज नाही. पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील ‘ऑनलाईन सर्व्हिसेस’ या लिंकवर क्‍लिक केल्यास ‘न्यू बिझनेस ॲप्लिकेशन’ ही लिंक उघडते. या लिंकवर व्यवसाय सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. अर्जासोबत जोडावयाची आवश्‍यक कागदपत्रे ‘स्कॅन’ करून ‘अपलोड’ करण्याची सुविधाही आहे. त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसेही वाचणार आहेत. अर्ज केल्यानंतर त्याच्या सद्यस्थितीची माहिती टप्प्याटप्प्याने अर्जदारास इमेल आणि एसएमएसद्वारे कळवली जाईल. ३१ ऑक्‍टोबरपासून ‘ऑनलाईन एक खिडकी पद्धती’ सुरू होईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. 

अर्ज करण्यापासून शुल्क भरण्यापर्यंतची कामे या ऑनलाईन एक खिडकीवर करता येतील. अगदी व्यवसायाचा परवानाही घरबसल्या मिळवता येईल. दुकानाचा किंवा व्यवसायाचा फलक निऑन साईन पद्धतीचा करायचा झाल्यास त्याची परवानगीही पालिकेकडून घ्यावी लागते.  यासाठी पालिकेच्या संबंधित खात्यांकडे अर्ज करावा लागतो.

Web Title: mumbai news Business license online