व्यावसायिकाचा पत्नी, मुलांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - व्यवसायात नुकसान झाल्याने निराश झालेल्या उमेश गुप्ता या व्यावसायिकाने पत्नीसह तीन मुलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 20) रात्री गोरेगावमध्ये घडली.

मुंबई - व्यवसायात नुकसान झाल्याने निराश झालेल्या उमेश गुप्ता या व्यावसायिकाने पत्नीसह तीन मुलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 20) रात्री गोरेगावमध्ये घडली.

हल्ल्यात उमेशची पत्नी ही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी उमेशला अटक केली आहे.
उमेश हा गोरेगावमधील आरेरोड येथील सुमीत आर्केड इमारतीत राहतो.

त्याचे मालाडच्या पठाणवाडी परिसरात लॉटरीचे दुकान आहे. या व्यवसायात त्याचे नुकसान झाले आहे. तो लॉटरीच्या छंदामुळेच कर्जबाजारी झाला असल्याने नैराश्‍यात होता. या नैराश्‍यातून मंगळवारी रात्री त्याने पत्नी बिंदूवर प्राणघातक हल्ला केला. जीव वाचवण्याकरिता बिंदू बेडरूममधून बाहेर आली, तेव्हा हॉलमध्ये झोपलेल्या दोन मुली जाग्या झाल्या. मध्यस्ती करण्याकरिता गेलेल्या दोन मुलींवरही उमेशने चॉपरने वार केले; तसेच मुलाच्या डोक्‍यावर चॉपरचा वार करून त्याला जखमी केले. हल्ल्यानंतर उमेश पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला.

Web Title: mumbai news businessman attack on wife and child