मध्ये रेल्वेवर 2 महिन्यांत सव्वासात लाख "फुकटे'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

मुंबई - विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासन कठोर कारवाई करत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल आणि मे या कालावधीत केलेल्या कारवाईत तब्बल 7 लाख 25 हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे.

मुंबई - विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासन कठोर कारवाई करत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल आणि मे या कालावधीत केलेल्या कारवाईत तब्बल 7 लाख 25 हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे.

गेल्या वर्षातील या काळातील कारवाईशी तुलना करता तब्बल एक लाख 95 हजार विनातिकीट प्रवासी वाढले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल व मे या महिन्यात केलेल्या कारवाईत पाच लाख 30 हजार फुकटे प्रवासी पकडले होते. त्या वेळी 29 कोटी 10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा एप्रिल व मे महिन्यात केलेल्या कारवाईतून 41 कोटी 22 लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली. मे महिन्यामध्ये तीन लाख 66 हजार विनातिकीट प्रकरणे आहेत. या महिन्यात 20 कोटी 74 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news central railway