नवरा बायकोत पण भांडण होतं, पण...: चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली आणि अजेंडा बघून ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई - शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला नसल्याचा दावा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवार) केला.    

चंद्रकांत पाटील म्हणाले - 

शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली आणि अजेंडा बघून ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली.

नवरा बायकोत पण भांडण होतं. पण त्यांच्या भांडणात tv नसतो. आम्हाला तुम्ही तुम्ही (माध्यमे) आहात आहात. म्हणून चर्चा होते!

उद्धवजी परदेशी असल्याने त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायचा असल्याने सेना मंत्री अनुपस्थित राहिले

आता फाटे न फोडता कर्ज माफीच्या डिटेलिंग वर काम करावं

या समितीत शेतकरी नेते, विरोधक, शिवसेना सगळेच असतील

5 - 6 हेक्टर वाल्यानां काय द्यावं, 50 लाख कर्ज असलेल्याना काय द्यावं, कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला काय द्यावं, या सगळ्याचा विचार मुख्यमंत्री करत आहेत

ही कर्जमाफी 32 हजार कोटी रुपयांएवढी एव्हडी मोठी असेल

 

Web Title: mumbai news: chandrakant patil assures on loan waiver