ज्येष्ठ नागरिकाला 49 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई - बंद झालेली विमा योजना पुन्हा सुरू करण्याचे प्रलोभन दाखवून बोरिवली येथे 72 वर्षांच्या वृद्धाची 49 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी दहा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे बोरिवलीतील रहिवासी आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी 72 लाख रुपयांचा विमा काढला होता. काही कारणास्तव त्यांनी हप्ते न भरल्याने विमा बंद झाला. त्यांना 2013 मध्ये लोकपाल विमा कार्यालयातून दूरध्वनी आला. समोरच्या व्यक्तीने तुमच्या नावाने विमा कंपनीविरुद्ध तक्रार आल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले; तसेच भरलेली हप्त्याची रक्कम आणि विम्याचे 70 लाख रुपये मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यानंतर विविध कारणे देऊन तक्रारदाराला 49 लाख 23 हजार रुपये विविध बॅंक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ही रक्कम जमा केली. त्यानंतर संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कुणीच प्रतिसाद देत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने बोरिवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: mumbai news cheating in mumbai