प्रदूषणामुळे आरोग्याला धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

तुर्भे - बोनकोडे सेक्‍टर- ११ मधील नाल्यात एमआयडीसीतील कंपन्या रासायनिक सांडपाणी सोडत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेकडे केल्यानंतर त्यांनीही दखल घेतली नसल्याने प्रदूषण नियंत्रण आणि पालिका यांच्याविरोधात हरित लवादाकडे तक्रार करण्याचा इशारा सौरभ पांडे या रहिवाशाने दिला आहे. 

तुर्भे आणि पावणे एमआयडीसीत अनेक केमिकल कंपन्या आहेत. राजकीय आशीर्वाद, प्रदूषण मंडळ आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे साटेलोटे यामुळे या कंपन्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडतात. या सांडपाण्यातून निघणारी दुर्गंधी व विषारी वायू यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कोपरखैरणेतून वाहणाऱ्या दोन मोठ्या नाल्यांमध्ये दररोज रात्री या कंपन्या सांडपाणी सोडतात. सेक्‍टर- ११ आणि कोपरखैरणे-घणसोलीतील हे दोन नाले वाशी खाडीला मिळतात. पावणेतील माजी नगरसेवक मधुकर मुकादम यांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे कोपरखैरण्यातील रहिवासी सौरभ पांड्या यांनी प्रदूषणाला जबाबदार एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांविरोधात कायदेशीर लढा सुरू केला आहे.  

याविषयीच्या तक्रारींकडे प्रदूषण नियंत्रण आणि पालिकाही दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्याविरोधात हरित लवादाकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नाल्यात पांढरा फेस
शनिवारी व रविवारी रात्री या कंपन्यांमधून नाल्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे परिसरात उग्र वासासोबत पांढऱ्या रंगाचा फेस येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकारची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. परंतु या दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे आरोग्याला धोका असल्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: mumbai news chemical water health