चेन्नई एक्‍स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा पसरवणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई - चेन्नई एक्‍स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन करणाऱ्याला रेल्वे पोलिसांच्या ठाणे गुन्हे शाखेने सोमवारी (ता. 16) गजाआड केले. अजय सुभाष चौबे असे त्याचे नाव आहे. 

सीएसटीहून सुटलेल्या चेन्नई एक्‍स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन बुधवारी (ता. 11) रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षात आला होता. त्यामुळे ही गाडी कल्याण स्थानकात थांबवण्यात आली. श्‍वानपथकाने तिची तपासणी केली असता, बॉम्ब ठेवल्याचा तो फोन भीती पसरवण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर म्हणजे दीड तासानंतर ही गाडी रवाना करण्यात आली. 

या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडे सोपवण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक होळकर यांच्या पथकाने तांत्रिक माहिती काढली. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक ठाणे पश्‍चिमेला हॉलीक्रॉस येथे पोहचले. पोलिसांनी कारपेटविक्रेते सुभाष देशमुख यांच्याकडे चौकशी केली. त्याच्या दुकानात काम करणाऱ्या अजय चौबेने दारूच्या नशेत गाडीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन केल्याचे उघड झाले. पोलिसांनी अजयची कसून चौकशी केली; मात्र त्याने तोंड उघडले नाही. त्याला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

मेलमधील चोर सर्किट गजाआड 
धावत्या मेलमध्ये चोऱ्या करणाऱ्याला रेल्वे गुन्हे शाखेने गजाआड केले. शरणाप्पा पांडुरंग वालेकर ऊर्फ खाबा ऊर्फ सर्किट असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सर्किटने चेन्नई एक्‍स्प्रेसमध्ये चोरी करून 3 लाख 65 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक धनवटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्या वेळी सर्किट चोऱ्या करून कर्नाटकला पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक गुलबर्गा येथे गेले. त्यापूर्वीच सर्किट तेथून पळाला; परंतु पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. सर्किटकडून दोन लाख 13 हजार 247 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news Chennai Express raided a bomb rumor