छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ: पॅराग्लायडर्स, बलूनवरील बंदी कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 जुलै 2017

मुंबई: छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्‍या वस्तू, पतंग उडविण्यास; तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमान उतरतेवेळी आणि उड्डाणावेळी अडथळा आणण्यास प्रतिबंध करणारे आदेश 27 ऑगस्ट 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलिस उपआयुक्त (ऑपरेशन्स) यांनी जारी केले आहेत. विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू; तसेच लेसर प्रकाश सोडून विमान जमिनीवर उतरतेवेळी आणि उड्डाणावेळी जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. विमानाच्या कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: mumbai news chhatrapati shivaji airport ballon ban

टॅग्स